Rishabh Pant: घड्याळाच्या नादात पंतने गमावले १ कोटी ६३ लाख, क्रिकेटरनेच केली फसवणूक

WhatsApp Group

भारताच स्टार यष्टिरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघाचा कर्णधार ऋषभ पंतची (Rishabh Pant) फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतला फसवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पण एक क्रिकेटर आहे. मृणांक सिंग (Mrinank Singh) असं या खेळाडूचे नाव आहे.

आरोपानुसार मृणांक सिंगने ऋषभ पंतला १ कोटी ६३ लाखांना गंडा घातला आहे. रिपोर्टनुसार मृणांक सिंगवरती पंतच्या मॅनेजरने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार ही कोट्यावधिंची फसवणूक मागिल वर्षी झाली होती.

मृणांक सिंगला महाराष्ट्रातील जुहू पोलिसांकडून याअगोदर अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ६ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप होता. ऋषभ पंत मृणांक सिंग कडून एक महागडे घड्याळ विकत घेणार होता, ज्यासाठी ऋषभ पंतने त्याला ३६ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे दिलेही होते. त्याचबरोबर एका दुसऱ्या घड्याळासाठी देखील पंतने त्याला ६२ लाख रुपये दिले होते. ऋषभ पंतने दिलेल्या तक्रारीमध्ये या सर्व घड्याळांची किंमत आहे.