आउट झाल्यावर रिषभ पंत प्रचंड संतापला; केलं धक्कादायक कृत्य, Viral Video

0
WhatsApp Group

राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीचा पंजाब किंग्जने 4 विकेटने पराभव केला होता. यानंतर आता राजस्थानविरुद्ध 12 धावांनी दारूण पराभव झाला आहे. कर्णधार रिषभ पंतला दुसऱ्या मॅचमध्येही चांगली धावसंख्या करण्यात अपयश आलं.  रिषभ पंत (Rishabh Pant) बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना प्रचंड संतापलेला दिसत होता. त्यानं स्टेडियमबाहेर गेल्यानंतर काय केलं त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

बाद झाल्यानंतर पंतने बाऊंड्री लाइनच्या बाहेर जाताच त्याने साइडच्या पडद्यावर जोरात बॅट मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाद झाल्यामुळे पंतची चिडचिड झाली होती, म्हणून त्याने असं कृत्य केलं.