Rishabh Pant: कार अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

WhatsApp Group

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कार अपघातानंतर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर 17 दिवसांनी पंतने सोशल मीडियावर आपली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर कठीण काळात साथ दिल्याबद्दल त्याने बीसीसीआयचे आभारही मानले. 30 डिसेंबर रोजी पंतच्या कारचा अपघात झाला. तो दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात असताना त्याची कार दिल्ली-डेहराडून महामार्गाच्या दुभाजकाला धडकली.

कार अपघातानंतर पंतला प्रथम डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पाठीला, पायाला आणि अस्थिबंधनाला जखमा होत्या. काही काळ डेहराडूनमध्ये राहिल्यानंतर ऋषभ पंतला विमानाने मुंबईला आणण्यात आले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात पंतची शस्त्रक्रिया करण्यात आली. पंतच्या उपचाराचा संपूर्ण खर्च बीसीसीआयने स्वतः उचलला आहे.

पंतची पहिली प्रतिक्रिया

ऋषभ पंतने ट्विटमध्ये लिहिले की, ‘मला मिळालेला पाठिंबा आणि प्रेम आणि आशीर्वाद यासाठी मी आभारी आहे. मला हे सांगण्यास आनंद होत आहे की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता मी बरे होण्यासाठी तयार आहे. पुढच्या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी मी तयार आहे. बीसीसीआय जय शाह आणि सरकारच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे खूप आभार.

ऋषभ पंत 2023 मध्ये मैदानापासून दूर राहू शकतो. त्याच्यावर लिगामेंटची शस्त्रक्रिया झाली आहे. पंत आयपीएल खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे या मोसमात त्यांचा संघ आता नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे.