Rishabh Pant बनला उत्तराखंडचा ब्रँड अम्बेसडर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी करणार सन्मान

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याची उत्तराखंड सरकारने आपल्या राज्याचा ब्रँड अम्बेसडर म्हणून नियुक्ती केली आहे. तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही जबाबदारी ऋषभ पंतवर सोपवली आहे. गुरुवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी दिल्लीतील उत्तराखंड सदनात पंतचा सन्मान करणार आहेत. ऋषभ पंत हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. तो हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथे वाढला आणि तेथेच त्याचे शिक्षण झाले. तो दिल्लीतून रणजी खेळायचा.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः ट्विट करून पंत यांची राज्याचा ब्रँड अम्बेसडर म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘उत्तराखंडमधील तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ऋषभ पंतला राज्य सरकारने “स्टेट ब्रँड अम्बेसडर” म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आपणास शुभेच्छा!’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

वयाच्या 24 व्या वर्षी राज्याचा ब्रँड अम्बेसेडर बनणे आश्चर्यकारक आहे, पंतने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करून हे नाव कमावले आहे. पंतच्या आधी त्याचा गुरू महेंद्रसिंग धोनीही या राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर राहिला आहे.

ऋषभ पंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने आतापर्यंत 31 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 54 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 2123, 840 आणि 883 धावा केल्या आहेत. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऋषभ पंतची दमदार खेळी सर्वांनाक आठवते. या खेळाडूने वयाच्या 24 व्या वर्षी टीम इंडियाची कमानही सांभाळली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पंत हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.