लखनौविरुद्धच्या सामन्यात केकेआरला 1 धावांनी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी केकेआरच्या जिगरबाज रिंकू सिंगने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने चुरस दाखवली. रिंकूने अप्रतिम फलंदाजी करत हरलेल्या सामन्यात खळबळ उडवून दिली. रिंकूने या सामन्यात 33 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 67 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धाव घेत रिंकूला दोन धावा काढता आल्या असत्या तर सामना रंगला असता. केकेआरला 2 चेंडूत 12 धावांची गरज होती. रिंकूने पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला पण लक्ष्य गाठता आले नाही. केकेआरचा पराभव झाला असला तरी संपूर्ण क्रिकेट जगत रिंकू सिंगचे कौतुक करत आहे. आता गौतम गंभीरही रिंकूसाठी ट्विट केल्याशिवाय राहू शकला नाही.
सामन्यानंतर गंभीर रिंकूशी बोलतानाही दिसला. रिंकूचा सोबतचा फोटो शेअर केला आहे.
What an effort by Rinku today! Sensational talent! pic.twitter.com/E2HmdeqiHJ
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 20, 2023
गंभीरने केलेले हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. गंभीर क्वचितच कोणत्याही खेळाडूबद्दल असे ट्विट करतो. जेव्हा त्याला वाटते की एखाद्या खेळाडूमध्ये खूप प्रतिभा आहे, तेव्हा गंभीर ट्विट करून त्या खेळाडूबद्दल आपले मत देतो.
केवळ गंभीरच नाही तर सेहवागनेही रिंकूचे ट्विट करून अभिनंदन केले आणि त्याच्या लढाऊ क्षमतेचे कौतुक केले.
Rinku Singh is an epitome of “Never Give Up”. Phenomenal season and what an incredible life story. So happy that his hardwork has transformed into outstanding performances and the world has taken note of his talent and ability. Salute to his attitude and fighting spirit #KKRvsLSG pic.twitter.com/plxiolTSTh
— Virender Sehwag (@virendersehwag) May 20, 2023