फूड डिलिव्हरीचं एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे जिथे एका व्यक्तीने ऑनलाइन अन्न मागितले तेव्हा त्याला हॉटेलने कच्चे मांस पाठवले होते. त्या व्यक्तीने हॉटेलविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर, न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने आपला निर्णय दिला आणि हॉटेलवर दंड आकारताना हॉटेलला नऊ लाख रुपये द्यावे लागतील असा आदेश दिला.
वास्तविक, हे प्रकरण इंग्लंडमधील एका शहरातील आहे, जिथे ही घटना एका आशियाई हॉटेलसोबत घडली. ‘डेली स्टार’मधील एका रिपोर्टनुसार, एक माणूस कॉर्नवॉलमध्ये असलेल्या एशियन बाउल्स नावाच्या चायनीज हॉटेलमध्ये एके दिवशी जेवणासाठी आला. जेव्हा तो तेथे पोहचला, तेव्हा त्याला आढळले की हॉटेलची अवस्था अतिशय वाईट आहे, तेथे अजिबात स्वच्छता नसून नियमांचे योग्य प्रकारे पालन केलं जात नाहीय आणि हे हॉटेल लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे.
यानंतर ती व्यक्ती तेथून परत आली आणि त्याने त्याच हॉटेलमधून चिकन मोमो ऑनलाईन मागवले. काही वेळानंतर हॉटेलवाल्यांनी चिकन मोमो त्या व्यक्तीच्या घरी पाठवले. जेव्हा व्यक्तीने ऑर्डर उघडली तेव्हा त्याला आढळले की मोमो कच्च्या मांसाने भरलेले आहे. यानंतर त्या व्यक्तीने हॉटेलमध्ये तक्रार केली आणि तेथील स्थानिक अन्न अधिकाऱ्याला बोलावले.
त्या माणसाने संपूर्ण गोष्ट अन्न अधिकाऱ्याला सांगितली. यानंतर अन्न अधिकारी त्या हॉटेलमध्ये पोहोचले. जेव्हा अधिकारी तेथे पोहचला तेव्हा त्याने पाहिले की या हॉटेलमध्ये भरपूर घाण असून त्याच स्थितीत अन्न तयार करून लोकांना दिले जात आहे.
यानंतर कोर्टाने निकाल देताना हॉटेलला दोषी ठरवत मोठा दंड ठोठावला. हॉटेल मालकाला ९ लाखांहून अधिक दंड भरावा लागला. याशिवाय ते हॉटेल बंदही करायला सांगितले. त्यानंतर बर्याच काळानंतर, काही अटींवर ते हॉटेल पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात आली.