बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही B.Tech, B.E पास असाल किंवा तुमच्याकडे M.Tech ही पदवी असेल तर तुम्हाला बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Recruitment) या बँकेत नोकरीची चांगली संधी आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये (Bank Of Baroda) IT विशेषज्ञ अधिकारी, डेटा वैज्ञानिक आणि डेटा अभियंता या पदांची भरती (Recruitment) करण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा या प्रक्रियेअंतर्गत एकूण 15 जागांची भरती करणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी इच्छुक असतील ते अर्ज करू शकतात.
या पदांसाठी 16 नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकता तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2021 असणार आहे.