पनवेल महानगरपालिकेत 377 पदांसाठी भरती, या लिंकवर करा अर्ज

0
WhatsApp Group

पनवेल महापालिकेच्या स्थापनेला सहा वर्षे उलटली तरी महापालिकेच्या आस्थापनेसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अखेर पनवेल महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी जाहीर अधिसूचनेद्वारे ‘अ’ ते ‘ड’ गटातील 377 रिक्त पदांसाठी थेट सेवेद्वारे थेट भरती प्रक्रिया जाहीर केली. 13 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत उमेदवार त्यांचे अर्ज भरू शकतात. अनेक वर्षांपासून या नोकरीच्या भरतीसाठी सुशिक्षित तरुणांना टार्गेट केले जात होते.

प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, कायदेशीर, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती आणि तंत्रज्ञान सेवा, लेखा आणि वित्त सेवा, पार्क सेवा, शहरी विकास सेवा, यांत्रिक सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, पॅरा मेडिकल सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखापरीक्षण इत्यादी विभागातील पदांवर भरती होणार आहे.

इच्छुक उमेदवार 17 ऑगस्टपर्यंत http://www.panvelcorporation.com, https://mahadma.maharashtra.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ईमेल आणिमेसेजद्वारे कळविण्यात येईल.

PDF जाहिरात – Panvel Municipal Corporation Jobs 2023
ऑनलाईन अर्ज – Panvel Mahanagarpalika Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com