
तुम्ही जर सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) विविध पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय नौदलाने फायरमनसह अनेक पदांसाठी भरतीसाठी (Indian Navy Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदलाने फार्मासिस्ट (Pharmacist), फायरमन (fireman) आणि पेस्ट कंट्रोल वर्कर (pest control worker) या रिक्त पदांची भरती होणार आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये (Employment News) या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी joinindiannavy.gov.in ला भेट द्यावी.
भारतीय नौदलाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत भारतीय नौदलामध्ये 127 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 पासून सुरु झाली असून 26 जून 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 जूनच्या आधी अर्ज करणे गरजेचे आहे.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु – 27 एप्रिल 2022
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 जून 2022
पदांचा तपशील –
रिक्त पदं – 127 पदं
फार्मासिस्ट – 1 पद
फायरमन – 120 पदं
पेस्ट कंट्रोल वर्कर – 6 पदं
शैक्षणिक पात्रता –
भारतीय नौदलातील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. दहावी पास उमेदवारच या पदांसाठी अर्ज करु शकतात.
निवड प्रक्रिया –
या भरतीअंतर्गत अग्निशमन दलाच्या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड फिटनेस चाचणी आणि कागदपत्र पडताळणीनुसार केली जाईल.
वयोमर्यादा –
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
असा करा अर्ज –
सर्व उमेदवारांना त्यांचे अर्ज विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रे विहित वेळेत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागतील. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिसूचनेद्वारे त्यांची पात्रता तपासली पाहिजे. दरम्यान, या भरतीशी संबंधित इतर महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in भेट द्यावी.