आधार कार्ड हा एक असा महत्वाचा दस्तऐवज आहे जो बँक खाते उघडण्यापासून ते सिम कार्ड घेण्यापर्यंत सर्वत्र खूप आवश्यक असतो. अशा परिस्थितीत तुमचे आधार कार्ड हरवले तर तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास तुम्ही मोबाईल नंबरशिवाय तुमचे आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता.
मोबाईल नंबरशिवाय आधार डाउनलोड करण्यासाठी प्रक्रिया
- UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (uidai.gov.in)
- होम पेजवरून ‘माय आधार’ हा पर्याय निवडा. आपण त्या पृष्ठाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात ड्रॉप-डाउन मेनूमध्ये पर्याय शोधू शकता.
- एकदा तुम्ही ‘माय आधार’ वर आल्यावर, स्क्रीनवर दिसणार्या ‘ऑर्डर आधार रीप्रिंट’ या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला तुमचा 12-अंकी आधार क्रमांक किंवा तुमचा 16-अंकी आभासी ओळख क्रमांक (VID) टाकावा लागेल.
- तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला सुरक्षा कोड टाकावा लागेल.
Aadhaar Card Upadte: आधार कार्ड किती वेळा करता येऊ शकते अपडेट, जाणून घ्या सर्व माहिती
- मोबाईल नंबरशिवाय कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ‘माझा मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा पर्यायी क्रमांक किंवा नोंदणी नसलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करावे लागेल.
- ‘अटी आणि नियम’ चेकबॉक्सवर क्लिक करा आणि शेवटी, ‘सबमिट’ वर क्लिक करा. ओटीपीची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल.
- यानंतर तुम्हाला आधार रिप्रिंट करण्यापूर्वी ‘प्रिव्ह्यू आधार लेटर’ची स्क्रीन दिसेल. तुमचे तपशील दोनदा तपासा. आता तुम्हाला पेमेंट पर्याय निवडावा लागेल आणि आता तुम्हाला PDF डाउनलोड करण्यासाठी तुमची डिजिटल स्वाक्षरी सबमिट करावी लागेल.
अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास मोबाईल नंबरशिवाय तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.