Good thoughts in marathi | यशस्वी जीवनासाठी नक्की वाचा हे सकारात्मक विचार

WhatsApp Group

Good thoughts in marathi : मित्रांनो, आज या लेखात आम्ही काही अतिशय उत्तम प्रेरणादायी मराठी सुविचार तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे सुविचार वाचून तुम्ही काहीतरी शिकू शकता आणि ते तुमच्या जीवनात लागू करू शकता. 

1 यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
2 आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
3 आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
4 मी करतो या भावनेचे नाव प्रपंच, तर परमेश्वर माझ्याकडून करवून घेतो या भावनेचे नाव परमार्थ !
5 विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्ती शिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही.
6 मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
7 आयुष्यात तुम्ही किती अनादी आहात ते महत्त्वाचं नाही तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्त्व आहे.
8 शब्दांमुळे माणसे जुळतात आणि तुटतातही म्हणून शब्दांची किमत समजून घ्या. आहात तोपर्यंत चार प्रेमाचे शब्द वापरा तेच कामी येतील.
9 तरुण स्त्रीला नुसती नवऱ्याची बायको होऊन चालत नाही तर कधी त्याची प्रेयसी, कधी बहिण फार तर काय कधीकधी आईही व्हावे लागते. कारण स्त्री शक्ती रुपीणी आहे.
10 जर आपण आपल्या कामाला आनंदाने स्वीकारले नाही तर काम कधीतरी आपल्याला चांगलाच आनंद देईल.

काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. 

11 जीभ हि दोन माणसात बसवते अन दोन माणसातून उठवते म्हणून शब्दांचा वापर व्यवस्थित करावा.
12 जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
13 क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
14 उद्यासाठीची सर्वात चांगली तयारी म्हणजे वर्तमानातील तुमचे सर्वोत्तम प्रयत्न होय.
15 आपण किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याचा विचार करा. दुर्बल माणूस कायम भीती बाळगतो तर शूर कायम ताठ मानेने जगतो.
16 भूतकाळात भटकत राहणे किंवा भविष्याबद्दल चिंता करणे यापेक्षा आजचा आलेला अनमोल क्षण सर्वोत्तम काम करून व्यतीत करा; मग यश तुमचेच.
17 अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
18 ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
19 सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे: पाप होईल इतके कमाउ नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये, आणि भांडण होईल इतके बोलू नये.
20 व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता. त्यामुळे सुविचार ही वाचणे खूप गरजेचे आहे. 

21 व्यर्थ गोष्टीची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. अश्रू येणे हे माणसाला हृदय असल्याचे द्योतक आहे.
22 खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात,पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
23 सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे, आपले गुपित कुणालाही सांगू नका ते तुम्हाला हानिकारक आहे.
24 ज्या व्यक्तीने कुठलीही चूक केली नाही त्या व्यक्तीने काहीही नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही.
25 आनंदी राहायच असेल तर अपेक्षा स्वतः कडून ठेवा, समोरच्यांकडून नव्हे.
26 केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.
27 दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.
28 दुःख विभागल्याने कमी होत आणि सुख विभागल्याने वाढते.
29 अज्ञानी असणं तेवढं शर्मेच नाही जेवढं काहीही शिकण्याची इच्छा न ठेवणं.
30 कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका.

कितीही कठीण परिस्थिती असली तरीही यशाच्या शिखरावर तुम्हाला पोहचण्यास हे प्रेरणादायी विचार तुम्हाला मदत करतील.

31 मित्र परिवारासारखे असावेत म्हणजे आयुष्याचे सोन होत.
32 तुमचं आनंदी राहणंच तुमच्या शत्रुकरिता सर्वात मोठी शिक्षा आहे.
33 प्रत्येक पतंगीला माहिती असत कि शेवटी कचऱ्यात जायचंय, पण त्याच्याअगोदर आकाश गाठायचंय. जीवन सुद्धा हेच मागत असत.
34 विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
35 विद्वत्त्ता सगळ्यांत असत, त्यानुसार जगण्याच धेर्य मात्र सगळ्यात नसत.
36 कष्टामुळे भविष्यकाळ चांगला होतो आणि आळसामुळे वर्तमानकाळ.
37 न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न कारण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं.
38 रोज काहीतरी उपयुक्त वाचून आत्मसात करायला शिका.
39 मनगटातली ताकद सपंली की माणूस हातामध्ये भविष्य शोधतो.
40 सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात , काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.