आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ‘हे’ सुविचार नक्की वाचा!

WhatsApp Group

मानवी जीवन समस्या, अडी-अडचणींनी व्यापलेलं आहे. जीवनातली प्रतिकूल परिस्थिती, समस्यांवर मात करताना, जीवनाचा योग्य मार्ग शोधताना अनेकांना नैराश्य येतं, हताश वाटतं. त्यामुळे त्यातून मुक्त होण्यासाठी सुविचार वाचणे खूप गरजेचे आहे. 

जोपर्यंत आपण एखाद्या कामाला सुरुवात करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट अशक्य वाटते.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.
नेहमीच तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका.
आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहावे.
जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो.
काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.
चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका कारण ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.
माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

जीवनात भरकटलेल्या माणसाला सुविचार योग्य मार्ग दाखवतात. मनातले सर्व गोंधळ, द्वंद्वं दूर होऊ शकतात. सुविचारांमुळे जीवनाचा योग्य मार्ग नक्कीच गवसतो.

आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.
यश तुमच्याकडे येणार नाही त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल.
तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारी व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.
खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
जितका मोठा संघर्ष असतो, तितकेच मोठे यश मिळत असते.
वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करणं अधिक महत्त्वाचं आहे. तुम्ही असं केलंत तर कायम विजयी व्हाल आणि तुमचं यश कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की, ते पाप आहे असे माहीत असूनही, आपण त्याला कवटाळतो.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
गरूडाइतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

जीवनात तुम्ही कितीही चांगली पुस्तकं वाचा, कितीही उत्तम सुविचार ऐका, पण जोपर्यंत जीवनात तुम्ही त्याचं अनुकरण करत नाही, तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.

✓ मोठी स्वप्ने पाहणारेच, मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
✓ खूप मोठा अडथळा आला की समजावं, आपण विजयाच्या जवळ आलो.
✓ स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
✓ जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
✓ आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
✓ न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
✓ जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
✓ कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
✓ यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
✓ जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.