Marathi Suvichar | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार एकदा नक्की वाचा…

WhatsApp Group

ज्या व्यक्तीला यश मिळवायचे असते, त्याला क्षुल्लक घटना ची आणि अपयशाची कधीच भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या होडीला समुद्रापुढे झुकायला आवडत नाही, म्हणून मोठया वादळातही बुडत नाही, अश्याच प्रकारचे उत्तम असा मराठी सुविचार संग्रह आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. 

1 दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हा सुद्धा एक अनुभवच असतो.
2 जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत तेव्हा. ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात..!!
3 आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
4 प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.
5 मोठी स्वप्ने पाहणारीच मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.
6 दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
7 कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री.
8 नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.
9 ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही, याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.
10 ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात, तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.

 

हे मराठी सुविचार रोज तुम्ही सकाळी वाचून तुम्ही तुमचा दिवसाची सुरूवात करू शकता. हे आपल्याला आपल्यामध्ये एक नवीन विचारांची ऊर्जा आणि सकारात्मकतेचा अनुभव देईल.

11
रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन
12 सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र.
13 प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा धरू नका.
14 मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.
15 स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे गटारीत पडले तरी त्याचे मोल कमी होत नाही.
16 धैर्यहीन मनुष्य तेलहीन दिव्यासारखा असतो.
17 आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.
18 यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतः ला ओळखणे.
19 नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.
20 तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या… मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.

 

Marathi Suvichar जे आपल्याला अधिक प्रेरणा देतात, निराशावादीला आशावादी बनण्यास प्रेरित करतात. आपल्या हृदयात किंवा मनात चांगले विचार किंवा चांगले सुविचार असतील तर आपण प्रत्येक समस्येला एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू शकतो व त्याचा परिणामकारकतेने सामना करू शकतो.

21 आपण फक्त आनंदात रहावे, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.
22 स्वतःला कमजोर समजणे हि मोठी चूक आहे.
23 स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.
24 आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.
25 चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
26 समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
27
सरावानेच अचूकता निर्माण करता येते.
28 आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते.
29 जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत, तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.
30 काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते, कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.

 

Suvichar हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात.

31 मैत्री हि वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो.
32 स्वतःची वाट स्वताच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत.
33 सुख हे पैशात नसून ते संतुष्टात असते.
34
गरज ही शोधाची जननी आहे.
35 पैशाने माणूस पशू बनतो.
36 कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही, आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
37 कपडा मळला तरी धुता येतो पण अब्रूवर पडलेला दाग आपल्या मरणाबरोबर सुद्धा मिटत नाही.
38 संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
39 सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
40 थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.