Marathi Suvichar | निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार

WhatsApp Group

मराठी सुविचार (Marathi Suvichar) वाचून तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला प्रेरणादायी बनवू शकता. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायी सुविचार घेऊन आलो आहोत. हे मराठी सुविचार तुम्ही रोज वाचून तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. “आयुष्यात आपल्याला काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता असते, पहिली गोष्ट म्हणजे ‘संकल्प’ आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारा ‘संघर्ष’. त्यासाठीच आम्ही आजच्या लेखामध्ये बेस्ट मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. 

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
अंथरूण बघून पाय पसरा.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
शरीरमाध्यम खलुं सर्वसाधनम ॥ 
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

संघर्ष केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. कधी कधी संघर्ष करताना माणूस हतबल होतो..निराश होतो पण मेहनत करावी लागते. Marathi Suvichar तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकेल.

एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दूर्मिळ असते.
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

Marathi Suvichar तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता. 

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

Marathi Suvichar जे आपल्याला अधिक प्रेरणा देतात, निराशावादीला आशावादी बनण्यास प्रेरित करतात. आपल्या हृदयात किंवा मनात चांगले विचार किंवा चांगले सुविचार असतील तर आपण प्रत्येक समस्येला एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू शकतो व त्याचा परिणामकारकतेने सामना करू शकतो. 

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.
नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.