Good Thoughts: निवांत वेळ काढून वाचा हे सुंदर प्रेरणादायी सुविचार

WhatsApp Group

जे नेहमी इतरांच्या मदतीसाठी तत्पर असतात, ते जीवनात कधीही दुःखी आणि अस्वस्थ राहत नाहीत.

11 गुलामगिरी नष्ट करावयाची असेल तर माणूस हा माणूस व्हावा लागतो.
12 खर्च करून आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.
13 क्रोधावर विजय मिळवाल तर बुद्धी टिकून राहील.
14 उद्योगप्रियता, बुद्धिमत्ता आणि सातत्य यामुळेच कीर्ती लाभते.
15 कायदा आंधळा, नीती पांगळी आणि समाज बहिरा असतो.
16 काचेसारखे तकलादू बनू नका तर हिरकणी व्हा.
17 कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
18 कर्म हीच पूजा, कर्म हीच उपासना.
19 जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.
20 ज्याच्या गरजा कमी, आणि स्वास्थ्य अधिक.
मोठी लढाई धैर्यानेच लढता येते. साधनांच्या कमतरतेची ओरड करणारे कधीच शिखरावर पोहोचत नाहीत.
21 मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो.
22 मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते.
23 यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.
24 ज्ञानाचा संचय केल्याने ते कमी होते, परंतु ते दुसऱ्याला दिल्याने अधिक वाढते.
25 ज्ञान हेच खरे सुवर्ण रत्न होय.
26 क्षमा म्हणजे ब्रह्म, क्षमा म्हणजे सत्य, क्षमा म्हणजे भूत, क्षमा म्हणजे भविष्य, क्षमा म्हणजे पावित्र्य होय. या संपूर्ण जगताला क्षमेनेच धारण केले आहे.
27 क्षुद्र माणसे नेहमीच अति चिकित्सक असतात.
28 अपमानाच्या पायांवरून ध्येयाचा डोंगर चढावा लागतो.
29 आचाराच्या उंचीवर विचाराची भव्यता अवलंबून असते.
30 आत्मविश्वास हेच संरक्षणाचे साधन आहे.

मनुष्य जन्माला येतो तो खाली हातानेच आणि मरतो खाली हातानेच ईश्वरचरणी जातो, मग आयुष्यात मीपणा का करत असतो याचे उत्तर मात्र कोणीही देऊ शकत नाही.

31 कलात्मकता ही कोणत्याही प्रसंगात केव्हाही प्रकट होत नसते.
32 अस्वस्थ वृत्ती कर्तृत्वाला जन्म देते.
33 वास्तवतेपेक्षा कृत्रिमता आकर्षक वाटत असते. वास्तवतेपेक्षा कृत्रिमता हाताळणे ही जास्त सुलभ असते, पण कृत्रिमता ही वाङ्मयाची वैरीण आहे हे विसरू नका.
34 व्यक्तीच्या हिताहून वेगळे समाजाचे हित नाही.
35 सामाजिक सुधारणांबरोबर राजकीय सुधारणाही आवश्यक आहेत.
36 भाषण व वर्तन यांतील परस्पर विरोध हा आमच्या लोकांचा राष्ट्रीय दोष आहे.
37 सगळ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो.
38 आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे प्रत्येक सुशिक्षिताचे पहिले कर्तव्य होय.
39 जिथे धाडस तेथे वैभव.
40 माता स्वतःचा मान जाणत नाही, ती जाणते माया.

संपत्तीने व समृद्धीने भरलेल्या घरात बोबडे बोल व दुडदुड धावणारी छोटी पावले नसतील तर त्या घराची आणि संपत्तीची किंमत सर्वस्वी व्यर्थ आहे.

सावधान! तुमच्या फोनमधून हे 9 धोकादायक Apps ताबडतोब डिलीट करा

Agent Portability: विमाधारकांसाठी मोठी बातमी, आता नको असलेला विमा एजंट बदलता येणार

41 आपले सत्यस्वरूप सिद्ध करण्यास सुवर्णाला अग्निदिव्य करावे लागते, हियाला घणाचे घाव सोसावे लागतात, तर माणसाला छळाचे हलाहल पचवावे लागते.
42 मोती शिंपल्यात पण मिळतात आणि मातीत पण मिळतात पण मातीतले मोती शरिराची क्षुधा भागवतात आणि शिंपल्यातील मोती देहाची शोभा वाढवितात.
43 निसर्ग माणसाच्या मनातील शैशव सदैव जपत असतो.
44 कोण कोणासारखा दिसतो यापेक्षा कोण कोणासारखा वागतो याला महत्त्व द्या.
45 जीवन फुलपाखरासारखे असावे पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे ठेवावे.
46 दुसऱ्याला मूर्ख ठरविताना आपल्या पदरी मूर्खपणाचे माप पडणार नाही ना याची दक्षता घ्यावी.
47 वेदातून महाकाव्य निर्माण होते.
48 मृगजळ मिथ्या असेल पण हरिणाची तहान मिथ्या नसते.
49 फुलाचा सुगंध फुलाला कधीच कळत नाही.
50 बागेची निगराणी करणारा माळी जर उत्कृष्ट असेल तर फळाफुलांचा ताटवा सदैव फुललेला व फळलेला राहिल.