विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने विराटचा हसणारा फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. या फोटाच्या कॅप्शनमध्ये तिने आपली विराटची आणि धोनीची एक जुनी आठवण शेअर केली आहे.
View this post on Instagram
अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मला 2014 मधला तो दिवस आठवतो, जेव्हा तू मला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार झाल्याचे सांगितले होते, तेव्हा धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे, तुझे आणि धोनीचे बोलणे झाले. धोनीने तुला सांगितले की, आता बघ तुझी दाढी किती लवकर पांढरी व्हायला लागेल. त्यावर आम्ही खूप हसले होते. तू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून केलेल्या प्रगतीचा आणि कामगिरीचा मला अभिमान आहे. असं अनुष्काने पोस्टमध्ये लिहिलं आहे.