
आयपीएल २०२५ मध्ये ३ मे रोजी आरसीबी विरुद्ध सीएसके सामना खेळवण्यात आला . या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २१३ धावांचा मोठा स्कोर केला. विराट कोहली आणि रोमारियो शेफर्ड यांनी आरसीबीकडून वादळ आणले. दुसरीकडे, आयुष म्हात्रेने सीएसकेसाठी दमदार फलंदाजी केली. त्यानेही एक शानदार खेळी केली. तरिही, सीएसकेला २ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
आरसीबीने २१३ धावा केल्या होत्या
प्रथम फलंदाजी करताना, जेकब बेथेल आणि विराट कोहली यांनी आरसीबीसाठी सलामीवीर म्हणून शानदार कामगिरी केली. जेकब बेथेलने ३३ चेंडूत ५५ धावांची शानदार खेळी केली. तर विराट कोहलीने ३३ चेंडूत ६२ धावा केल्या. विराट कोहलीने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. याशिवाय, रोमारियो शेफर्डने १४ चेंडूत ५३ धावा करत आरसीबीला मोठी धावसंख्या गाठून दिली. आरसीबीने ५ विकेट गमावून २१३ धावा केल्या होत्या.
२१४ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेला चांगली सुरुवात मिळाली. शेख रशीद आणि आयुष म्हात्रे यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी मिळून ५१ धावा केल्या. मात्र, रशीद ४.३ षटकांत बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. पण म्हात्रेने शानदार फलंदाजी केली. यानंतर, रवींद्र जडेजानेही शानदार अर्धशतक झळकावले. म्हात्रे ४८ चेंडूत ९४ धावा करून बाद झाला. त्याने ९ चौकार आणि ५ षटकार मारले. रवींद्र जडेजाने ४५ चेंडूत ७७ धावांची शानदार नाबाद खेळी केली. पण म्हात्रे आणि जडेजा सीएसकेचा विजय निश्चित करू शकले नाहीत. शेवटच्या षटकात सीएसकेने २ धावांनी सामना गमावला. २० षटकांनंतर, सीएसकेने ५ गडी गमावून २११ धावा केल्या.
अशी होती गोलंदाजांची कामगिरी
सीएसकेकडून खलील अहमदने सर्वाधिक धावा दिल्या. त्याने १९ व्या षटकात ३३ धावा दिल्या. अशाप्रकारे, तो सीएसकेसाठी एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला. खलीलने ३ षटकांत ६५ धावा दिल्या होत्या. तर मथिशा पाथिरानाने ४ षटकांत ३६ धावा देत ३ फलंदाजांच्या विकेट घेतल्या. आरसीबीकडून लुंगी न्गिडीने ४ षटकांत ३० धावा देत ३ फलंदाजांना बाद केले.