RCBने घेतला मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज खेळाडूकडे सोपवली संघाची कमान

WhatsApp Group

महिला प्रीमियर लीग 4 मार्चपासून सुरू होत आहे. सर्व फ्रँचायझींनी महिलांच्या लिलावात सर्वोत्कृष्ट खेळाडूंची खरेदी केली आहे. आता आरसीबी संघाने एका स्टार महिला खेळाडूला कर्णधार बनवले आहे. ही खेळाडू स्फोटक फलंदाजीत माहिर आहे. आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

आरसीबी संघाने सुपरस्टार महिला खेळाडू स्मृती मानधना हिच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. मंधाना महिला प्रीमियर लीग लिलावात मंधाना सर्वात महागडी खेळाडू ठरली, तिला 3.40 कोटी रुपयांमध्ये आरसीबी संघात समाविष्ट करण्यात आले. तिला आधीच कर्णधारपदाचा अनुभव आहे. तिने 11 T20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये भारताने 6 T20 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत.

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी व्हिडिओद्वारे स्मृती मानधनाचे कर्णधार बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. कोहली म्हणाला की, संघाचे नेतृत्व करणे हा नेहमीच चांगला अनुभव असतो. आता 18 क्रमांकाच्या जर्सीला या फ्रँचायझीचे कर्णधारपद मिळाले आहे. डु प्लेसिसनेही मानधनाचे कौतुक केले आहे.

स्मृती मंधानाने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकवले आहेत. डावाच्या सुरुवातीला ती चांगली फलंदाजी करते. 26 वर्षीय स्मृती मंधानाने भारतासाठी 112 टी-20 सामन्यांमध्ये 2651 धावा आणि 77 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3073 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर चार कसोटी सामन्यांमध्ये 325 धावा केल्या आहेत.

WPL साठी RCB संघ:
स्मृती मानधना (भारत), रेणुका सिंग (भारत), सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), रिचा घोष (भारत), एरिन बर्न्स (ऑस्ट्रेलिया), दिशा कासट (भारत), इंद्राणी रॉय (भारत), श्रेयंका पाटील (भारत), कनिका आहुजा (भारत), आशा शोभना (भारत), हीदर नाइट (इंग्लंड), डेन व्हॅन निकर्क (दक्षिण आफ्रिका), प्रीती बोस (भारत), पूनम खेमनार (भारत), कोमल जंजाड (भारत), सहाना पवार (भारत), मेगन शुट (ऑस्ट्रेलिया).