RBI चा मोठा निर्णय; 2000 रुपयांची नोट चलनातून बाद, तुमच्याकडे असेल तर ‘हे’ काम करावे लागेल

0
WhatsApp Group

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी मोठा निर्णय घेत 2000 रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना 2000 रुपयांच्या नव्या नोटा ग्राहकांना देणे बंद करण्यास सांगितले आहे.

आरबीआयने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्यात आली आहे. 2000 रुपयांची ही नोट नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, जर तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असेल तर तुम्ही 23 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान बँकेत जाऊन 2000 रुपयांची नोट बदलू शकता. 2 हजाराच्या 10 नोटा एकावेळी बदलता येतील. तुमच्याकडे 2000 च्या 10 पेक्षा जास्त नोटा असतील तर तुम्ही त्या थेट तुमच्या बँकेत जमा करू शकाल. तुम्ही बँकेत कितीही 2000 च्या नोटा जमा करू शकता – तुम्हाला याबद्दल कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत किंवा तुम्ही नोटा कुठून आणल्या याची कोणतीही माहिती घेतली जाणार नाही.

रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानंतर तुम्ही या गोष्टी समजून घ्याव्यात. पहिली गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेने बँकांना ही नोट देण्यास मनाई केली आहे. जर तुमच्याकडे ही नोट असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकेत जाऊन ही नोट बदलू शकता. 2 हजाराच्या 10 नोटा एकावेळी बदलता येतील. म्हणजेच 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा एकावेळी बदलता येतील.