RBI Repo Rate Hike: कर्ज घेणे महागणार, EMI हप्ताही वाढणार, RBI ने सलग चौथ्यांदा रेपो रेट 0.50% ने वाढवला

WhatsApp Group

RBI Repo Rate Hike: सणासुदीच्या काळात तुमचा ईएमआय अधिक महाग झाला आहे. RBI ने सलग चौथ्यांदा रेपो दरात ( Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेट 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. आरबीआयच्या आर्थिक धोरणाच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली आहे. म्हणजेच आता पाच महिन्यांत 1.95 टक्के वाढ झाली आहे.

आरबीआयच्या या निर्णयानंतर गृहकर्जापासून ( Home Loan) ते कार कर्ज ( Car Loan) आणि शैक्षणिक कर्ज ( Education Loan) महागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे, त्यांचा ईएमआय अधिक महाग होईल. चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर RBI गव्हर्नरने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महागाई वाढल्यामुळे घेतलेला निर्णय

28 सप्टेंबरपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू झाली. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7 ( Consumer Price Index) टक्के होता. त्यामुळे महागाई रोखण्यासाठी आरबीआयला व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

2022-23 या आर्थिक वर्षात RBI ने वाढत्या महागाईनंतर सलग चौथ्यांदा रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 मे रोजी रेपो रेट 40 बेसिस पॉईंट्सने वाढवून 4.40 टक्के करण्यात आला होता, त्यानंतर 8 जून रोजी 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आला होता, त्यानंतर ऑगस्टमध्ये रेपो रेट पुन्हा 50 बेसिस पॉईंटने वाढवण्यात आला होता. आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी रेपो दरात पुन्हा 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली. RBI च्या या निर्णयानंतर रेपो रेट 1.90 टक्क्यांनी वाढला आहे. RBI च्या ताज्या निर्णयानंतर खाजगी ते सरकारी बँकांकडून कर्ज घेणे महाग होऊ शकते.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा