रिझर्व्ह बँकेने झटपट लोन देणाऱ्या या प्रसिद्ध अ‍ॅपवर घातली बंदी, हे ‘अ‍ॅप’ तुमच्या मोबाईलमध्ये तर नाही ना?

WhatsApp Group

आजकाल मोबाईल ऍपच्या माध्यमातून झटपट कर्ज देण्याचा व्यवसाय तेजीत आहे. या कंपन्या सहजपणे कर्ज वाटप करतात. मग ते त्यांचे विचीत्र नियम आणि महागडी कर्जे देऊन सर्वसामान्यांना त्रास देतात. हे पाहून सरकार आणि रिझर्व्ह बँक आता अत्यंत कडक कारवाई करत आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने अनियमित कर्ज देण्याच्या क्रियाकलापांसाठी राइनो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी रद्द केली आहे Rhino Finance app ban.

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, आउटसोर्सिंग आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे डिजिटल कर्जाच्या ऑपरेशनमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वाजवी व्यवहार संहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे, राइनो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नोंदणीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. हे असे उपक्रम आहेत, जे सार्वजनिक हितासाठी हानिकारक मानले गेले आहेत. सेंट्रल बँकेने म्हटले आहे की नोंदणीचे प्रमाणपत्र रद्द केल्याने कंपनीला बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून काम करण्यापासून रोखले जाईल.

या अ‍ॅप्सवरही घालण्यात आली बंदी : आरबीआयने म्हटले आहे की, “कंपनी जास्त व्याज आकारण्याशी संबंधित विद्यमान नियमांचे पालन करत नव्हती आणि कर्ज वसुलीत ग्राहकांशी अन्यायकारक वागणूक देत होती. कोको कॅश, फ्लॅश लोन, ब्रिज लोन, क्रेझी बी आणि रुपी बस यांचा या अ‍ॅप्समध्ये समावेश आहे.