पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा धक्का, आरबीआयने नवीन खाती उघडण्यास घातली बंदी!

WhatsApp Group

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी पेटीएम पेमेंट्स बँकेला Paytm Payments Bank कोणतेही नवीन ग्राहक जोडण्यास प्रतिबंध घातला आहे. अधिकृत निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की, “भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपल्या अधिकारांचा वापर करून, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत, नवीन ग्राहकांना पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये खाती उघडण्यास अटकाव केला आहे.”

यासह, आरबीआयने डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन खाती उघडण्यापासून प्रतिबंधित केले आहे action taken by RBI against Paytm Payments Bank Ltd
.शुक्रवारी एका निवेदनात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन खाती उघडण्यापासून रोखणारा आदेश जारी केला. तसेच पेटीएम पेमेंट्स बँकेचे आयटी ऑडिट करण्याचे आदेशही दिले आहेत.


RBI ने पेमेंट्स बँकेला सूचना तंत्रज्ञान (IT) प्रणालीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी IT ऑडिट कंपनी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. “पेटीएम पेमेंट्स बँकेची नवीन ग्राहक खाती उघडणे हे आयटी ऑडिटर्सच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर आरबीआयने दिलेल्या विशिष्ट परवानगीच्या अधीन असेल,” असे रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेची स्थापना ऑगस्ट 2016 मध्ये करण्यात आली होती. आणि त्याची औपचारिक सुरुवात झाली.