मुंबई – त्रिपुरा हिंसाचारानंतर महाराष्ट्रातील नांदेड शहरात काल झालेल्या हिंसाचारासाठी महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीला (Raza academy) जबाबदार धरले आहे. रझा अकादमीला दहशतवादी संघटना असून त्यांनीच हिंसाचाराचा कट रचल्याचा राणे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नांदेड शहरात काल झालेल्या हिंसाचारामागे रझा अकादमीचा हात असल्याचे नितेश राणे (BJP MLA nitesh rane) म्हणाले. त्यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने रझा अकादमीवर कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला त्यांना संपवावे लागेल, असेही राणे म्हणाले.
महाराष्ट्रातील नांदेड शहरात कालच्या हिंसाचारानंतर आता परिस्थिती शांत आहे. पोलिसांनी काही ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. कालच्या हिंसाचारात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले. या प्रकरणाचा तपास नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात सुरू आहे.
This terrorist organisation Raza academy is behind all the violonce and riots in different parts of Maharashtra!
Every time they disrupt n break all the rules n Gov sits and watches..
Either the Gov bans them or we have to finish them in the interest of Maharashtra!— nitesh rane (@NiteshNRane) November 13, 2021
मुंबईतील भिंडीबाजार, नागपाडा, पायधुनी, डोंगरी, ठाण्यातील मुंब्रा, कौसा, कोपरी परिसरात रझा अकादमीच्या आवाहनावर बंदचा परिणाम दिसून आला मात्र शांततापूर्ण वातावरण राहिले. मात्र या बंदचा सर्वाधिक हिंसक परिणाम नांदेड शहर आणि मालेगाव येथील सदर परिसरात दिसून आला. या दोन शहरांमध्ये 4 पोलिसांसह डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय दुकाने बंद करताना तोडफोड, लुटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
हिंसाचार प्रकरणात 14 जणांना ताब्यात घेतले, 5 एफआयआर दाखल
आतापर्यंत महाराष्ट्रभर पोलिसांनी सुमारे 14 जणांना ताब्यात घेतले असून 5 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. आज ताब्यात घेतलेल्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे.मालेगाव, नांदेड, अमरावती, वाशीम या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
काही भागात कलम 144 लागू
महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्यांतील एसपी, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले असून आणि काही भागात 4 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: मालेगाव आणि नांदेडमध्ये पोलीस अत्यंत दक्ष आहेत.
महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये घडल्या हिंसक घटना
राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये हाणामारी, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. या 6 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मालेगाव शहर, विदर्भातील वाशीम आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील बीड आणि परभणीमध्ये बंद दरम्यान हिंसक घटना घडल्या.