IND vs SL: सर रवींद्र जडेजाने ठोकलं शानदार शतक

WhatsApp Group

मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सातव्या क्रमाकांवर फलंदाजीस आलेला भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने शानदार शतक साजरं केलं आहे Ravindra Jadeja century. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील हे पहिलंच शतक ठरलं आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत ६ बाद ३५७ धावा केल्या होत्या.

रवींद्र जडेजाचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले आहे. यासोबतच त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १०० धावा होती, मात्र आता तो हा आकडा त्याने मागे टाकला आहे. जडेजाने १६० चेंडूमध्ये १० चौकारांच्या मदतीने आपले हे दुसरे कसोटी शतक पूर्ण केले.

रवींद्र जडेजाने ४ वर्षांपूर्वी २०१८ ला राजकोटच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावलं होतं. या सामन्यात भारतीय संघाची ५ बाद  २२८ अशी धावसंख्या असताना जडेजा फलंदाजील आला होता. यानंतर त्याने  पंतसोबत १०४ धावांची भागीदारी केली तर नंतर अश्विनसोबत १३० धावांची भागीदारी करत भारताला  अत्यंत मजबूत स्थितीत आणले.