सर’ रवींद्र जडेजाने आयसीसी कसोटी क्रमावारीत पहिल्या स्थानी

WhatsApp Group

मोहाली कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या ‘सर’ रवींद्र जडेजाने आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमावारीत मोठी झेप घेतली आहे. रवींद्र जडेजाने भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्याने या सामन्यात भारतासाठी नाबाद १७५ धावांच्या खेळी केली तर श्रीलंकचे ९ विकेट्सही गारद केले. जडेजाने श्रीलंकेच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना ५ विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात ४ विकेट आपल्या नावावर केल्या. या अष्टपैलू खेळीचा जडेजाला आयसीसीने क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.

आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली असून यात अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजाने पहिलं स्थान मिळवलं आहे. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या जडेजाला दोन स्थानांनी बढती मिळाली आहे. यापूर्वी तो तिसऱ्या स्थानावर होता. याच यादीत भारताच्या रविचंद्रन अश्विनला तिसरे स्थान मिळालं आहे.

रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू खेळिच्या जोरावर भारताने श्रीलंकेवीरुद्धची ही पहिली कसोटी तीन दिवसात एक डाव आणि २२२ धावांनी जिंकली होती. या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या जडेजाला सामनाविर पुरस्कार देण्यात आला होता.