
सध्या आयपीएल २०२२चा रणसंग्राम सुरू आहे. आतापर्यंत ४०हून जास्त सामने पार पडले आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असलेल्या रवींद्र जडेजाने आपले कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे जडेजा आता चांगलाच चर्चेत अल आहे. चेन्नईचे नेतृत्व आता धोनी करणार करताना दिसणार आहे. ही माहिती चेन्नईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
???? Official announcement!
Read More: ????#WhistlePodu #Yellove ???????? @msdhoni @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 30, 2022
चेन्नई सुपर किंग्सच्या प्रेस रिलीझनुसार, रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय त्याने घेतला आहे आणि एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करण्याचे स्विकार केले आहे.
महेंद्रसिंग धोनीने आयपीएल १५ सुरू होण्याच्या काही दिवस आधी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या जागी रवींद्र जडेजाकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला आठ पैकी सहा सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिला विजय मिळवला. तर दुसरा विजय मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळवला होता.