रवींद्र जडेजाने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव खेळाडू

0
WhatsApp Group

Ravindra Jadeja: 2023 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी खूप खास होते. यावर्षी क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा एकदिवसीय विश्वचषक ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केला. टीम इंडियाने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. भारतीय स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजासाठी 2023 हे वर्ष खूप खास होते. या वर्षी रवींद्र जडेजाने एक अशी कामगिरी केली जी जगातील इतर कोणत्याही खेळाडूला करता आली नाही.

रवींद्र जडेजाने इतिहास रचला

रवींद्र जडेजाने गेल्या वर्षी 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात त्याने 30.65 च्या सरासरीने 613 धावा केल्या आणि 66 बळी घेतले. यासह रवींद्र जडेजा हा 2023 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 हून अधिक धावा आणि 50 हून अधिक बळी घेणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. जडेजा व्यतिरिक्त भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनीही गेल्या वर्षी 500 हून अधिक धावा केल्या, पण त्यांना 50 बळींचा टप्पा गाठता आला नाही.

2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या

रवींद्र जडेजा 2023 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 66 विकेट घेतल्या. या यादीत कुलदीप यादव 63 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही गेल्या वर्षी 63 तर पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने 62 बळी घेतले होते.

रवींद्र जडेजा सध्या टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. पण पाठीच्या वरच्या भागात दुखापत असल्याने तो कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नाही. मात्र, आता तो बरा असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.