
IPL 2023 : चार वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचे एकमेकांपासून वेगळे होणे जवळपास निश्चित झाले आहे. सीझन-15 मध्ये दोघांमध्ये अंतर्गत मतभेद झाले होते आणि त्यावेळी असेही वृत्त आले होते की जडेजा चेन्नई संघापासून आता वेगळा होणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, IPL-15 पासून दोघांमध्ये कोणताही संपर्क नाही आणि ते वेगळे होणार आहेत. परदेश दौर्यावरून परत आल्यानंतर जडेजा पुनर्वसनासाठी बंगळुरूमधील हसल येथील एनसीएमध्ये गेला, परंतु यादरम्यान त्याने सीएसकेशी संपर्क साधला नाही.
आयपीएलच्या 15व्या हंगामात माजी चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला वाईट टप्प्यातून जावे लागले. अष्टपैलू जडेजाला हंगामाच्या सुरुवातीला CSK संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली CSK संघाला सतत पराभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडले. इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, जडेजाचे व्यवस्थापक इतर संघांशी ऑफरबाबत चर्चा करत आहेत.
जडेजाला हंगामाच्या मध्यात CSK च्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल्यापासून तो अस्वस्थ आहे. आणि याच कारणामुळे त्याने फ्रँचायझी सोडण्याची तयारी केली होती. असं देखील सांगण्यात येत आहे. जडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित होता.