Kasba Peth Assembly By-Election: कसबा पेठ मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य घेऊन मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपची सत्ता असूनही पराभव पत्करावा लागला आहे.
जय हो!
सत्ता, पैसा, गुंडगिरी, धमक्या आणि दबावाला टाचाखाली चिरडत #मविआ ने भाजपच्या नाकाखालून #कसबा विधानसभेची जागा हिसकावून घेतली. हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे!
विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/oh5UooSyYQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 2, 2023