मुंबई – रवीना टंडनचे Raveena Tandon वडील रवी टंडन यांचे ११ फेब्रुवारीला सकाळी निधन झाले. रवी टंडन 86 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला Ravi Tandon Passes Away. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे.
सनातनी नियम मोडून रवीना टंडनने स्वतः वडिलांची अंत्ययात्रा काढली. तिच्यासोबत पती अनिल थडानी आणि भाऊ राजीव टंडन होते.
— Raveena Tandon (@TandonRaveena) February 11, 2022
रवी टंडनच्या वडिलांचे पहाटे ३.४५ वाजता निधन झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ते वयाशी संबंधित समस्यांशी झुंज देत होते. वडिलांच्या निधनावर रवीना टंडनने भावनिक पोस्ट लिहिली आहे.
You will always walk with me , I will always be you, I’m never letting go. Love you papa. pic.twitter.com/y7ipML09hO
— Raveena Tandon (@TandonRaveena) February 11, 2022
रवी टंडन यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक मोठे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. यामध्ये ‘खेल खेल में’, ‘अनहोने’, ‘नजराना’, ‘मजबूर’, ‘खुद्दार’ आणि ‘जिंदगी’ यांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नीचे नाव वीणा आहे. रवी आणि वीणा यांना राजीव आणि रवीना ही दोन मुले आहेत.
हेही वाचा
शेंगदाणे विकणारा ‘कच्चा बदाम’ गाण्याचा गायक भुबन बड्याकरची संपूर्ण कहाणी
चाणक्य नीति: ‘या’ 5 गोष्टी कोणालाही सांगू नका, येऊ शकते मोठी अडचणीत!