India vs England: भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का; रविचंद्रन अश्विन तिसऱ्या कसोटीतून बाहेर, कारण…

WhatsApp Group

India vs England 3rd Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1अशी बरोबरीत आहे. इंग्लंड संघाने पहिला कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना 106 धावांनी जिंकून शानदार पुनरागमन केले. आता दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 445 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने आतापर्यंत 2 गडी गमावून 207 धावा केल्या आहेत. या सामन्याला फक्त दोन दिवस राहिले आहेत, मात्र आता एक स्टार भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विन तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने दुसऱ्या दिवशी चांगली गोलंदाजी केली आणि एक विकेटही घेतली. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, मात्र आता त्याच्या बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

बीसीसीआयने जारी केलेल्या प्रकाशनात असे लिहिले आहे की, ‘रविचंद्रन अश्विनला तत्काळ कसोटी संघातून बाहेर करण्यात आले आहे, कारण त्याच्या कुटुंबात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली आहे. या कठीण काळात बीसीसीआय पूर्णपणे रविचंद्रन अश्विनच्या पाठीशी उभी आहे. बोर्ड अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल.’

मिळालेल्या माहितीनुसार, रविचंद्रन अश्विनची आई आजारी आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी X वर पोस्ट केले आणि लिहिले – “मी रविचंद्रन अश्विनच्या आईच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. त्याला राजकोट कसोटी सोडून आईसोबत राहण्यासाठी चेन्नईला जावे लागले. या आव्हानात्मक काळात बोर्ड आणि संघ अश्विनला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

रविचंद्रन अश्विनची गणना भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 बळी घेत कसोटी क्रिकेटमधील 500 बळी पूर्ण केले. तो भारतासाठी सर्वात वेगवान 500 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 98 कसोटी सामन्यांमध्ये 500 बळी घेतले आहेत. ज्यामध्ये 34 वेळा 5 विकेट्सचा समावेश आहे.

रविचंद्रन अश्विन बाहेर पडताच संघ व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठे संकट फिरकी विभागाची जबाबदारी कोण घेणार हे आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. आता चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी या दोघांवर असेल.