अलविदा रवी शास्त्री सर! भारतीय संघ तुम्हाला मिस करेल..

WhatsApp Group

विश्वचषक स्पर्धेत सोमवारी खेळण्यात आलेला नामिबियाविरुद्धचा सामना हा रवी शास्त्री यांचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता. रवी शास्त्री यांनी या सामन्यापूर्वी आपल्या कारकिर्दीबद्दल सांगताना म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जगातील सर्वोत्तम संघ तयार केला आहे, भारतीय संघाने प्रत्येक संघाला त्यांच्या घरी पराभूत केले आहे.

आपल्या कोचिंग कार्यकाळाबद्दल रवी शास्त्री म्हणाले, ‘हा एक अद्भुत प्रवास होता, जेव्हा मी हे काम हाती घेतले तेव्हा मला वाटलं होतं की बदल घडवून आणावा लागेल आणि कदाचित तो बदल मी घडवला आहे. टीम इंडियाने गेल्या पाच वर्षात जे काही साध्य केले ते अभूतपूर्व आहे.


रवी शास्त्री पुढे म्हणाले की, आमच्या संघाने प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम संघ असल्याचे सिद्ध केले. आम्ही प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली, पण विदेशात जाऊन कसोटी सामने जिंकणे हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. आम्ही प्रत्येक संघाला पराभूत केले आहे, प्रत्येक फॉरमॅटमध्ये पराभूत केले आहे आणि विशेष म्हणजे आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना पराभूत केले आहे.