आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आली रवीना टंडन!

WhatsApp Group

मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने पोस्ट शेअर केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनही आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. रवीना टंडनने आर्यनसाठी एक ट्वीट करत त्याची ही अटक लज्जास्पद असल्याचे म्हटले असून या तरुणाईच्या भविष्याशी खेळले जात असल्याचे म्हटले आहे. रवीना टंडनचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रवीना टंडनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आर्यन खानसोबत लज्जास्पद राजकारण खेळले जात आहे. हे लोक एका तरुणाच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळत असल्याचा आरोपही तिने लावला आहे.

यापूर्वी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. काही दिवसांपूर्वी आर्यनला अटक झाल्यानंतर सलमान खानही शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी ‘मन्नत’ बंगल्यावर गेला होता. तर

मुंबई येथे एका क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून आर्यन खान 2 ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. या आरोपावरुन नुकतीच न्यायालयाने आर्यन खानसह इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनसह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.