रत्नागिरी; बेपत्ता झालेल्या त्या…तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ.!|

0
WhatsApp Group

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील स्टेट बँकेची कंत्राटी कर्मचारी असलेल्या 24 वर्षीय बेपत्ता तरुणीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या युवतीचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबीयांनी दापोली पोलिस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

दापोलीहून चिपळूण तालुक्यातील ओमळी या गावी निघालेल्या निलिमा सुधाकर चव्हाण या तरुणीचा बुडून मृत्यू झाला, तिच्या मृत्यूचे कारण काय किंवा तिने आत्महत्या कशी केली हे अद्यापही गूढ आहे.