
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाने आता मोफत रेशन योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत अन्नधान्य मोफत मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना अन्नधान्य मोफत उपलब्ध होणार आहे.
मोफत अन्नधान्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. अन्न अनुदानावर 2 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. गरिबांकडून काहीही घेतले जाणार नाही असं पियुष गोयल यांनी सांगितलं.
याशिवाय वन रँक वन पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी 20600 पेन्शनधारकांना लाभ मिळत होता. आता सुधारणा केल्यानंतर 25 लाख पेन्शनधारक झाले आहेत. त्यामुळे 8500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. वन रँक वन पेन्शन (OROP) अंतर्गत संरक्षण दलातील कर्मचारी/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनाच्या पुढील सुधारणांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता संरक्षण दलातील निवृत्तीवेतनधारक/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना OROP प्रस्तावानुसार वाढीव पेन्शन मिळेल.
IPL 2023 मिनी लिलाव संपला, जाणून घ्या विकल्या गेलेल्या सर्व स्टार खेळाडूंची यादी
Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा