महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे, किती मिळणार पैसे? पाहा

WhatsApp Group

महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत.

जानेवारी 2023 पासून या 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रती लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे असा खूप महत्त्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

ाराज्य सराकरच्या या नव्या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. केशरी रेशन कार्डधारक म्हणजेच एपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.