Ration Card Update: आता रेशनकार्ड लाभार्थ्यांना मोफत गहू मिळणार नाही

WhatsApp Group

Ration Card Update: तुम्ही रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या रेशन कार्ड संदर्भातील निर्णयाचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये 19-30 जूनपर्यंत मोफत रेशनचे वाटप केले जाणार आहे. मात्र, यावेळी लाभार्थ्यांना गव्हाऐवजी 5 किलो तांदूळ वाटप करण्यात येतील. म्हणजेच, यावेळी तुम्हाला मोफत रेशन अंतर्गत गव्हापासून वंचित राहावे लागणार आहे. या संदर्भात अन्न व रसद विभागाच्या आयुक्तांनी आदेशही जारी केले आहेत.

आतापर्यंत मोफत रेशन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले जात होते. मात्र, अन्न व रसद विभागाच्या आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार यावेळी लाभार्थ्यांना गव्हाऐवजी केवळ पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यूपीसोबतच अनेक राज्यांमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.