
सध्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले आहेत. कारण सध्या भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचे चित्र दिसत आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये देखील भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाजपाल्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत अनेक भाज्यांनी शंभरी पार केली आहे. कोबी, मिरची, शेवगा या पिकांना सध्या चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं आहे. कांद्याच्या दरामध्ये मात्र मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.