मुंबई महापालिकेत उंदीर घोटाळा? शहरातील उंदीर मारण्यासाठी तब्बल 1 कोटींचा खर्च

WhatsApp Group

मुंबई – मुंबई महापालिकेत Brihanmumbai Municipal Corporation उंदीर मारण्याचा घोटाळा Rat scam  झाला असा आरोप भाजपने स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा उंदीरांपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नाश करण्यात येतो.

उंदिर मारण्यासाठी 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागामध्ये म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 1 कोटी रुपये खर्च करून उंदिरांचा नाश करण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.

 ‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल

प्रभाकर शिंदे म्हणाले कि, एक उंदिर मारण्यासाठी 20 रुपये ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास 22 रुपये या किंमतीने उंदिर मारण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. पालिकेने फक्त 5 वॉर्डमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदिर मारले याचा आकडा पालिकेने समोर आणलेला नाहीय. असं प्रभाकर शिंदे यांनी सांगितले आहे.

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम

प्रभाकर शिंदे पुढे म्हणाले, याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहे . तसेच पुढील बैठकीत माहिती येईपर्यंत प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे.

बापरे! 6 वर्षांच्या मुलीच्या पोटात सापडला दीड किलो केसांचा गोळा