‘सामी-सामी’ गाण्यावर गरबा, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर रश्मिका मंदान्नाने दिली ही मजेशीर प्रतिक्रिया

WhatsApp Group

Rashmika Mandanna: साऊथचा सुपरहिट चित्रपट पुष्पामधील ‘सामी-सामी’ हे गाणे इतक्या दिवसानंतरही चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. या चित्रपटातील हे गाणे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्यावर चित्रीत करण्यात आले असून यातील डान्स स्टेप्स सर्वत्र ट्रेंड होत आहेत. नुकतेच नवरात्र सुरू झाले असून आता हेच गाणे गरब्यासाठीही चाहत्यांची पसंती बनले आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात लोक ‘सामी सामी’ गाण्यावर गरबा करताना दिसत आहेत. दुर्गापूजेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून असे डान्सचे व्हिडिओ समोर येत आहेत आणि आता रश्मिका मंदान्नाही ते पाहून आश्चर्यचकित झाली आहेत. या व्हिडिओंवर त्यांनी आपली प्रतिक्रियाही दिली आहे. अशाच एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना रश्मिका मंदान्नाने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला Craaaaazzzyyyyyy अशी कमेंट केली आहे.

खाली शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गरब्यात रश्मिका मंदान्नाच्या डान्स स्टेप्स सुंदरपणे करत आहेत आणि जबरदस्त डान्स करत आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी या गाण्यावर गरबा करताना दिसत आहेत.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा