‘पुष्पा’ची ‘श्रीवल्ली’ पुन्हा एकदा Oops Momentची शिकार; व्हिडिओ होतोय व्हायरल

WhatsApp Group

Rashmika Mandanna Oops Moment: ‘पुष्पा’ या चित्रपटाने हिंदी प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झालेली साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात पोहोचली, जिथे तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रेड कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान करून पुष्पाची श्रीवल्ली जेव्हा रेड कार्पेटवर दाखल झाली तेव्हा सगळेच थक्क झाले.

यावेळी रश्मिकाने खूप छोटा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत होती, अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी तिला टोमणेही मारायला सुरुवात केली की, जर ती या आउटफिटमध्ये एवढी अस्वस्थ होती तर मग तिने असे कपडे का घातले? मात्र, रश्मिकाची ओप्स मोमेंटची शिकार होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)


पण यावेळी रश्मिकाने सर्वांची मने जिंकली जेव्हा तिने मीडिया फोटोग्राफर्सच्या विनंतीवरून सर्वांसोबत फोटोसाठी पोज दिली, त्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सर्व फोटोग्राफर रश्मिकासोबत फोटो काढण्याची विनंती करतात, अशा परिस्थितीत ती नकार देऊ शकत नाही आणि ग्रुप फोटो काढण्यास तयार होते. मात्र, यादरम्यान ती तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे थोडी अस्वस्थ दिसत होती.