
अल्लू अर्जुन स्टारर ब्लॉकबस्टर फिल्म ‘पुष्पा: द राइज’ मधील ‘सामी सामी’ या ब्लॉकबस्टर गाण्यावर साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने अभिनेता गोविंदासोबत डान्स केला आहे. अभिनेत्रीने अलीकडेच ‘डीआयडी सुपर मॉम्स’ मध्ये हजेरी लावली जिथे तिने तिच्या आता ट्रेंडिंग नंबरवर डान्स केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतं आहे.
View this post on Instagram
गोविंदाने रश्मिकासोबत त्याच्या खास स्टाईलमध्ये हा डान्स केलाय. रश्मिका टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. गोविंदा आणि रश्मिकाचा सामी सामी गाण्यावरील डान्स चाहत्यांना प्रचंड आवडलाय.