Rashmi Shukla: राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

WhatsApp Group

Rashmi Shukla: IPS अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक (DGP) असतील. सूत्रांनी शुक्रवारी (29 डिसेंबर) ही माहिती दिली. शुक्ला सध्याचे पोलिस महासंचालक (DGP) रजनीश सेठ यांच्याकडून राज्य पोलिसांची सूत्रे हाती घेण्यास तयार आहेत. रजनीश सेठ हे लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. रश्मी शुक्ला सध्या डीजी पदावर केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. शुक्ला यांनी यापूर्वी राज्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून त्यात पुणे पोलिस आयुक्त आणि राज्य गुप्तचर शाखेचे संचालक यांचा समावेश आहे. फोन टॅपिंग प्रकरणानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

2015-2019 या कालावधीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्यात सत्तेवर असताना राजकारण्यांचे फोन कथितपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये शुक्ला यांच्यावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर पुण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आला होता. .