BBL : राशिदने अवघ्या ४ ओव्हर्समध्ये १७ धावा देत ६ फलंदाजांना धाडले माघारी

WhatsApp Group

ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असेलल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या बिग बॅश लीग ( Big Bash League )या टी२० स्पर्धेत दिग्गज गोलंदाज राशिद खानचा ( Rashid Khan ) करिश्मा पाहायला मिळाला. राशिदने आजवर भारताच्या आयपीएलसह जगभरातील अनेक टी२० लीगमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे.

बिग बॅश लीगमध्ये मंगळवारी खेळण्यात आलेल्या अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यातील सामन्यात राशिद खानने कहर गोलंदाजी करत जगभरात पुन्हा एकदा आपलं नाव चर्चेत आणलं आहे. खेळल्या गेलेल्या या सामन्यात अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळताना राशिदने ब्रिस्बेन हीटच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडून काढले. ब्रिस्बेन हीटच्या २ नव्हे ३ नव्हे तर तब्बल ६ गोलंदाजांना तंबूत माघारी धाडत राशिद एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीतही राशिदने आपली चमक दाखवली. त्याने तळाला फलंदाजीला फक्त ४ चेंडू खेळून १३ धावा चोपल्या. त्याच्या या छोटेखानी खेळीत २ दमदार चौकांराचा समावेश होता.

राशिद खानच्या फिरकीत ब्रिस्बेन हीट फसला!

अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सने विजयासाठी दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीटची सुरुवात चांगली झाली. मात्र राशिद खान गोलंदाजीला येताच त्यांची धांदल उडाली. ६२ धावांवर २ विकेट्स अशा चांगल्या स्थितीत खेळत असलेला ब्रिस्बेन हीटचा संघ अवघ्या ९० धावांवर सर्वबाद झाला. आणि  स्ट्रायकर्सने हा सामना ७१ धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात राशिदने ४ षटकांमध्ये १७ धावा देत ६ विकेट्स आपल्या नावावर केले.


टी-20 क्रिकेट इतिहासातील राशिदची ही सर्वोत्तम गोलंदाजीही ठरली आहे. बिग बॅश लीग स्पर्धेत आजवरजी ही तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. यापूर्वी लसिथ मलिंगाने ७ धावांवर ६ विकेट्स घेतले होते तर इश सोधी ११ धावा देत ६ विकेट्स गारद केले होते.

राशिद खानचा ३०० वा टी-२० सामना

मंगळवीरी खेळण्यात आलेला सामना हा राशिद खानचा टी-२० मधील ३०० वा सामना ठरला. यात त्याने ७६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने आणि ५६ आयपीएल सामने खेळला आहे.

आयपीएल मेगा ऑक्शनकडे असेल राशिदची नजर

आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वीच राशिद केलेल्या या शानदार कामगिरीमुळे सर्व संघमालकांचे लक्ष त्याच्यावर असणार आहे. तसेच गेली अनेक वर्षे राशिद आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आला आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावात त्याला फार मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. राशिद गेल्यावर्षीपर्यंत हैदराबाद संघाचा स्टार प्लेअर होता मात्र या वर्षासाठी हैदराबादने धक्कादायक निर्णय घेत त्याना रिटेन न करता रिलीज केले.