
अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खान सध्या SA20 लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे. या स्पर्धेत राशिद खान एमआय केपटाऊनचे नेतृत्व करत आहे. त्याच वेळी, एमआय केपटाऊन आणि पारल्स रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना, रशीदने २ विकेट घेत इतिहास रचला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशीद खानच्या संघानेही स्थान मिळवले आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स
एमआय केपटाऊनकडून गोलंदाजी करताना, रशीद खानने पार्ल रॉयल्सविरुद्ध २ विकेट्स घेतल्या. यासह, रशीद खान आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. आता रशीदने ४६१ सामन्यांमध्ये ६३३ विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत रशीदने वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होलाही मागे टाकले आहे. ब्राव्होने टी-२० क्रिकेटमध्ये ६३१ विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्होने ५८२ सामन्यांमध्ये ६३१ विकेट्स घेतल्या.
𝗥𝗘𝗖𝗢𝗥𝗗-𝗕𝗥𝗘𝗔𝗞𝗜𝗡𝗚 𝗥𝗔𝗦𝗛𝗜𝗗!
Rashid Khan passes Dwayne Bravo to become the leading T20 wicket-taker of all time! 🔥 pic.twitter.com/2fn7jq2UO5
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 4, 2025
आता रशीदनंतर, ड्वेन ब्राव्हो ६३१ विकेटसह यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, वेस्ट इंडिजचा सुनील नारायण ५७४ विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे, दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज इम्रान ताहिर ५३१ विकेटसह चौथ्या स्थानावर आहे, तर शकिब अल हसन ४९२ विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.