Thaynara Marcondes: अरे देवा! २२ वर्षांच्या मुलीला झाला एक विचित्र आजार, स्तनांचा आकार ठरला लाजिरवाणा

WhatsApp Group

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना दुर्लभ आणि विचित्र आजारांनी ग्रासले आहे. या आजारांवर उपचार करणे डॉक्टरांसाठीसुद्धा आव्हानात्मक ठरते. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या चर्चेत आला आहे. ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका २२ वर्षांच्या शिक्षिकेला असा विचित्र आजार झाला की तिच्या स्तनांचा आकार काही महिन्यांत इतका वाढला की तो १२ किलोपर्यंत पोहोचला.

ही तरुणी आहे थायनारा मार्कोंडेस, ब्राझीलमधील रहिवासी आणि व्यावसायिक शिक्षिका. काही महिन्यांपूर्वी तिच्या जीवनात अशी वेळ आली की, तिच्या स्तनांचा आकार असामान्य वेगाने वाढू लागला. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले, पण जसजसा आकार वाढत गेला, तसतसे तिच्या दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेवटी तिला शस्त्रक्रिया करावी लागली, आणि ही शस्त्रक्रिया तब्बल १० तास चालली.

शस्त्रक्रियेदरम्यान काय घडलं?

या ऑपरेशनमध्ये डॉक्टरांनी तिच्या शरीरातून सुमारे १० किलो अतिरिक्त स्तनाच्या ऊती काढून टाकल्या. थायनाराने सोशल मीडियावर स्वतःचा अनुभव शेअर करताना सांगितले की, “पूर्वी मी सहज मध्यम आकाराचे कपडे वापरत असे, पण स्तनाचा आकार इतका वाढला की मला खास कपडे मागवावे लागले. अनेकदा मला सार्वजनिक ठिकाणी लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले.”

थायनाराने आणखी सांगितले की, “माझी अवस्था अशी झाली होती की मी ब्रा घालू शकत नव्हते. लोक माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले होते. हे पाहून मी हबकले आणि शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.”

नेमका कोणता आजार आहे हा?

थायनाराच्या मते, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कळले की तिला गिगॅन्टोमास्टिया (Gigantomastia) नावाचा एक दुर्मिळ आजार आहे. या आजारात स्तनाचा आकार अनियंत्रितपणे वाढतो.

सीएनएन ब्राझीलला दिलेल्या मुलाखतीत थायनाराने सांगितले की, “माझ्या दैनंदिन जीवनात मी अनेक अडचणींचा सामना केला. कधी कधी वेदना इतक्या तीव्र असायच्या की मला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत असे.”

आश्चर्याची बाब म्हणजे, जगभरात केवळ ३०० लोकांना हा आजार झाल्याचे नोंदले गेले आहे.

उपचारासाठी किती खर्च आला?

थायनाराला शस्त्रक्रियेसाठी सुमारे $7,200 (भारतीय रुपयात सुमारे ६ लाख) एवढा खर्च आला. तिने हा खर्च सार्वजनिक देणगीच्या माध्यमातून उभा केला.

डॉक्टरांनी तिला सल्ला दिला आहे की, या आजारात स्तनाच्या ऊती पुन्हा वाढू शकतात, त्यामुळे तिच्यावर नियमित वैद्यकीय देखरेख ठेवली जाणार आहे. थायनाराची ही कहाणी अनेकांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. पण तिच्या धैर्याने आणि सकारात्मकतेने अनेकांना प्रेरणा दिली आहे.