
Cristiano Ronaldo Rape Case: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कॅथरीन मायोर्गा नावाच्या मॉडेलने पुन्हा एकदा अमेरिकन कोर्टात धाव घेतली आहे. तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 2009मध्ये लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा मॉडेलने केला आहे.
मॉडेल कॅथरीनने रोनाल्डोवर दीर्घकाळ बलात्कार केल्याचा आरोप केला होता. यानंतर हे प्रकरण बराच काळ न्यायालयात चालले. अमेरिकेतील एका न्यायालयाने नुकतीच या प्रकरणात रोनाल्डोची निर्दोष मुक्तता केली. पण मॉडेलने पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. मॉडेलने बलात्काराचा आरोप करत रोनाल्डोकडून $375,000 नुकसान भरपाईची मागणी केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डोच्या केसमध्ये अमेरिकन कोर्टाच्या न्यायाधीशांनी निकाल देताना आदेशात म्हटले आहे की, कॅथरीनच्या वकिलाने नियमांनुसार हा खटला लढलेला नाही. तक्रार दाखल करण्याची प्रक्रियाही योग्य नाही. या कारणास्तव न्यायालयाने या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. कोर्टाने 2019 मध्ये सांगितले होते की, रोनाल्डोवर गुन्हा दाखल करता येणार नाही, कारण त्यात फक्त संशय आहे.
द सनच्या वृत्तानुसार, मॉडेल कॅथरीन मेयोर्गाने यावेळी पुन्हा याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकन कोर्ट ऑफ अपीलमध्ये बडतर्फीच्या कलमाखाली याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 23 ऑगस्ट रोजी फोनद्वारे होणार आहे.