शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंग बनणार डॉन! चित्रपट याच वर्षी होणार प्रदर्शित

0
WhatsApp Group

डॉन हा लोकप्रिय चित्रपट ज्यामध्ये शाहरुख खानच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले होते. पुन्हा एकदा त्याचा सिक्वेल घेऊन येत आहे. फरहान अख्तर ‘डॉन 3’ दिग्दर्शित करणार आहे. तसेच, आता त्याने या चित्रपटाबाबत काही खुलासे केले आहेत, जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. फरहान अख्तरने या अफवांना पुष्टी दिली आहे की शाहरुख खान नवीन डॉन चित्रपटात डॉनची भूमिका पुन्हा करणार नाही.

डॉन (2006) आणि डॉन 2 (2011) चे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शकाने इंस्टाग्रामवर एक नोट लिहिली, ज्यामध्ये त्याने डॉनची मशाल पुढे नेणाऱ्या एका नवीन अभिनेत्याबद्दल सांगितले. फरहानने रणवीर सिंग हा नवा डॉन असणार पुष्टी दिली नाही, मात्र त्याने आशा व्यक्त केली की चाहते फ्रँचायझीच्या नवीन अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव करतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)