Riyan Parag: रियान परागकडे मोठी जबाबदारी, ‘या’ संघाचा बनला कर्णधार

WhatsApp Group

Riyan Parag: भारताचा उदयोन्मुख स्फोटक फलंदाज रियान परागवर आगामी रणजी ट्रॉफी सामन्यासाठी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला आसामचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रायन तंदुरुस्त आहे आणि काही महिन्यांनंतर मैदानात परतण्यास सज्ज आहे. उजव्या हाताचा हा अष्टपैलू खेळाडू ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी परागला संघापासून दूर ठेवण्यात आले आहे. पराग बराच काळ जखमी होता. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतूनही दुर्लक्षित करण्यात आले.

गेल्या वर्षी पदार्पण केले
आयपीएल २०२४ मध्ये परागने अद्भुत कामगिरी केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. परागने गेल्या वर्षीच भारतासाठी टी-२० आणि एकदिवसीय पदार्पण केले. त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मध्ये भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. परागचे पुनरागमन आसाम संघासाठी आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या हंगामात परागने आसामसाठी ६ डावात ७५.६० च्या सरासरीने ३७८ धावा केल्या होत्या. याशिवाय, या उजव्या हाताच्या फलंदाजाने २० षटकारही मारले.

रणजी करंडक स्पर्धेसाठी आसाम संघ
रियान पराग (कर्णधार), दानिश दास (उपकर्णधार), मुख्तार हुसेन, मृण्मय दत्ता, राहुल सिंग, दीपज्योती सैकिया, परवेझ मुसरफ, सुमित घाडीगावकर (यष्टीरक्षक), ऋषभ दास, अनुराग तालुकदार (यष्टीरक्षक), अविनव चौधरी, शिवशंकर रॉय, आकाश सेनगुप्ता, प्रद्युम सैकिया, अमलनज्योती दास.

रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप डी मध्ये आसाम सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी आहे. आसामने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये एकही सामना जिंकलेला नाही. आसामने आतापर्यंत २ सामने गमावले आहेत आणि ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. आसाम बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ३० जानेवारी रोजी राजकोटमध्ये आसाम आणि सौराष्ट्र यांच्यातील सामना खेळवण्यात आला.