दिल्ली विरुद्ध तामिळनाडू Delhi vs Tamil Nadu यांच्यात गुवाहाटी यांच्यात रणजी ट्रॉफी स्पर्धेचा सामना सुरू आहे. या मॅचमध्ये भारताच्या विश्वविजयी अंडर 19 Under 19 World Cup 2022 संघाचा कर्णधार यश धूलने Yash Dhull ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रणजी पदार्पणातील मॅचमध्ये दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावण्याची ऐतिहासिक कामगिरी यश धूलने केली आहे.
यश धूलने या मॅचमध्ये चौथ्या आणि शेवटच्या दिवशी दुसऱ्या इनिंगमध्ये शतक झळकावले. त्याने 13 चौकारांच्या मदतीने हे शतक झळकावले. तामिळनाडूने दिल्लीवर पहिल्या इनिंगमध्ये 42 रनची आघाडी घेतली होती. त्याला उत्तर देताना दिल्लीने दमदार सुरूवात केली. यश धूल आणि ध्रुव शौर्य या दोन्ही दिल्लीच्या सलामीवीरांनी दुसऱ्या इनिंगमध्ये शतके झळकावली आहेत.
????????????????. ????. ????????????????????! ???? ????
???? in the first innings ????
???? in the second innings ????What a way to announce his arrival in First-Class cricket! ???? ???? #RanjiTrophy | #DELvTN | @Paytm
Well done, @YashDhull2002! ???? ????
Follow the match ▶️ https://t.co/ZIohzqOWKi pic.twitter.com/V9zuzGuQjk
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 20, 2022
यशने पहिल्या इनिंगमध्ये ११३ रन काढले होते. रणजी स्पर्धेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात पदार्पणातील मॅचमधील दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावणारा यश हा तिसरा बॅट्समन ठरला आहे. याआधी गुजरातकडून नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी १९५२-५३ मधील सिझनमध्ये आणि महाराष्ट्राकडून विराग आवटे Virag Awate यांनी २०१२-१३ मधील सिझनमध्ये ही कामगिरी केली होती.